संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन अकोल्यात मुलींचे ‘आयटीआय’ येथे रविवारी कार्यक्रम

 

संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन

अकोल्यात मुलींचे ‘आयटीआय’ येथे रविवारी कार्यक्रम

अकोला दि. 13 : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापित संविधान मंदिराचा उद्घाटन समारंभ रविवारी दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीने होणार आहे.

मुख्य समारंभ मुंबईत

कौशल्य ,रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने आयटीआय येथे संविधान मंदिर स्थापित करण्यात आले आहे. त्याचा राज्यातील मुख्य समारंभ मुंबई येथे होईल. त्यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने राज्यातील विविध संस्थांमधील संविधान मंदिराचे उद्घाटन होणार आहे. मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असतील. यावेळी अकोला येथे रतनलाल प्लॉटमधील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणाऱ्या कार्यक्रमाला विविध मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संविधान मंदिराच्या शुभारंभ कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी व प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी केले आहे.

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज