‘पीएम किसान’ योजनेत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन
‘पीएम किसान’ योजनेत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन
अकोला, दि.
26 : पीएम किसान योजनेत स्वयं नोंदणीकृत लाभार्थीना
मान्यता मिळणे व अपात्रता मागे
घेण्याकरीता सर्व कागदपत्रांची पूर्तता अर्जदारांनी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
स्वयं
नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती –
प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजनेत नवीन स्वयंनोंदणी
करणा-या लाभार्थ्यांनी योजनेच्या
पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे २०० केबी
फाइल मर्यादेत अपलोड करावीत. त्यात मागील
तीन महिन्यातील डिजिटल / तलाठी सहीचा ७/१२ उतारा, जमीन नोंदीचा
फेरफार (लाभार्थीच्या नावे जमीन धारणा ०१/०२/२०१९ पूर्वीची असणे आवश्यक आहे. अपवाद
वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण).
वारसा नोंद फेरफार मयत दिनांक ०१/०२/२०१९ नंतरची असल्यास ज्यांना
नावावरून वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला /असलेला फेरफारही सोबत
जोडावा. पती, पत्नी व १८ वर्षा खालील अपत्यांचे आधार
कार्ड (सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत). सर्व ऑनलाइन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळली जातील व नंतर लाभार्थीना
मान्यता मिळेल.
लाभार्थी
अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती – लाभार्थी अपात्रता मागे
घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज, तसेच लाभार्थीचे
पोर्टलवरील स्टेटस प्रिंट, आधार कार्ड (पती, पत्नी व १८ वर्षा खालील अपत्ये ) परिशिष्ट ब (कृषि सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले), नवीन
७/१२ व ८ अ उतारा (डिजिटल / तलाठी सहीचा), वरीलप्रमाणे
जमीन नोंदीचा फेरफार / वारसा नोंदीचा फेरफार, वरील सर्व
अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे दोन प्रतीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर
करावीत, असे आवाहन श्री. किरवे यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा