जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 8 हजार 91 प्रकरणे निकाली एकूण 16 कोटी 60 लक्ष रू. ची तडजोड
जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 8 हजार 91 प्रकरणे
निकाली
एकूण 16 कोटी 60 लक्ष रू. ची तडजोड
अकोला, दि. 30 ; राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने
जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 1 हजार 299 प्रलंबित व 6
हजार 792 दाखलपूर्व अशा एकूण 8 हजार 91 प्रकरणात समेट घडून आला. त्यात एकूण 16 कोटी
60 लक्ष 74 हजार 975 रू. ची तडजोड झाली.
जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबिक, औद्योगिक न्यायालय
व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे शनिवारी (28 सप्टेंबर) राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात
आली. सर्व न्यायालयांतील 9 हजार 679 प्रकरणांपैकी 8 हजार 91 प्रकरणे निकाली निघाली.
त्यात दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद याबरोबरच मोटार अपघात, एनआय ॲक्ट, ग्रा. पं. पाणीपट्टी,
घरपट्टी, महावितरण व बँकांची प्रकरणे समाविष्ट होती.
उपक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा
व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व न्यायाधीश, अधिकारी व
कर्मचारी यांचे योगदान मिळाले. अकोला जिल्हा बार असोसिएशन, पोलीस अधिक्षक कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे सहकार्य मिळाले, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव
योगेश पैठणकर यांनी दिली.
अधिक्षक व्ही. डी. उबाळे, संजय रामटेके, प्रसन्न गादिया, हरिश इंगळे,
शाहबाज खान व न्यायालयातील सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा