जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे वाढली

 विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण

जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे वाढली

अकोला, दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्‍या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे वाढली असून, एकूण केंद्रांची संख्या 1 हजार 741 झाली आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून सर्व विधानसभा मतदार संघांच्या सुसुत्रीकरण प्रस्‍तावांबाबत मान्‍यताप्राप्‍त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत चर्चा करण्‍यात आली व प्रस्तावित बदलांबाबत त्यांना अवगत करण्‍यात आले. यासंबंधी आक्षेप व सूचना मागवण्‍यात आल्‍या होत्‍या. त्या विचारात घेऊन व प्रशासकीय बाबी तपासून मतदान केंद्र सुसुत्रीकरण प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला. त्याला भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 1 हजार 719 मतदान केंद्रे होती. या केंद्रांत नव्याने 22 मतदान केंद्रांची भर पडली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आता 1 हजार 741 मतदान केंद्रे आहेत.

 

विधानसभा मतदारसंघनिहाय केंद्रे

२८- अकोट विधानसभा मतदार संघातील पूर्वीच्या 336 मतदान केंद्रांत १० नवीन मतदान केंद्रांची भर पडली आहे. त्यामुळे मतदारसंघात आता एकुण ३४६ मतदान केंद्रे झाली आहेत.

 

२९ बाळापूर विधानसभा मतदार संघातील पूर्वीचे ३४० मतदान केंद्रांत ७ नवीन मतदान केंद्रे स्‍थापित असून, मतदारसंघात आता एकूण ३४७ मतदान केंद्र आहेत.

३० अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात एकही मतदान केंद्र वाढलेले नाही. त्‍यामुळे मतदार संघात सध्‍या पूर्वीप्रमाणेच ३०७ मतदान केंद्रे आहेत.

३१ अकोला पूर्व विधानसभा मतदार संघात केंद्र संख्येत नव्याने वाढ नाही. त्‍यामुळे मतदारसंघात सध्‍या पूर्वीप्रमाणेच ३५१ मतदान केंद्रे आहेत.

३२ मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील पूर्वीचे ३८५ मतदान केंद्रांच्‍या संख्‍येत ५ नवीन मतदान केंद्र स्‍थापित असून आता एकूण ३९० मतदान केंद्र झाले आहेत.

           स्थलांतरित मतदान केंद्रे

अकोला जिल्‍ह्यातील एकूण ८१ मतदान केंद्रे इमारत नादुरुस्‍तीमुळे लगतच्‍या सुस्थितीत असलेल्‍या इमारतीमध्‍ये स्‍थलांतरित करण्‍यात आली आहेत. तसेच एकुण ६३ मतदान केंद्रांतील मतदार संख्‍या ही १३५० पेक्षा अधिक होत असल्‍यामुळे सदर मतदान केंद्रातील काही मतदारांना लगतच्‍या मतदान केंद्रामध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आले आहे.

        सुसुत्रीकरणानुसार सर्व मतदान केंद्रांची यादी जिल्‍हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, दिवाणी न्‍यायालयेतहसील  कार्यालयसंबंधित क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयेपोलीस ठाणे, महानगरपालिकानगरपालिकापंचायत समिती कार्यालये ग्रामपंचायत आदी सर्व ठिकाणी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. अकोला जिल्‍ह्याच्या www.akola.nic.in या शासकीय संकेतस्‍थळावरही यादी उपलब्ध आहे. नागरिकांनी अवलोकन करुन संबंधित मतदान केंद्रांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

 

                                                      0000   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज