पालकमंत्र्यांच्या हस्ते घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व संत गाडगेबाबा नागरी बेघर निवारा इमारतीचे लोकार्पण
अकोला, दि. २२ : अकोला महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविकाअंतर्गत निर्मित संत गाडगेबाबा नागरी बेघर निवारा इमारतीचे लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज झाले.
खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने, जयंत म्हसने, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
अकोला महापालिकेच्या पुढाकाराने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. बेघर निवारागृहाच्या वास्तूची निर्मिती गुणवत्तापूर्ण झाली आहे. असे वेगवेगळे प्रकल्प महापालिकेने आदर्श प्रकल्प म्हणून चालवावे. शहराचे सौंदर्य व सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, असे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा