होमगार्ड पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध हरकत असल्यास कळविण्याचे आवाहन

maharashtracdhg.gov.in


होमगार्ड पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध

हरकत असल्यास कळविण्याचे आवाहन

अकोला, दि. 12 : अकोला जिल्हा होमगार्डतर्फे पुरूष व महिलांसाठीच्या रिक्त जागांची सदस्य नोंदणी प्रक्रिया नुकतीच झाली. त्यात पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वा. पूर्वी आक्षेप, हरकती कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांची तात्पुरती यादी maharashtracdhg.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यादीतील गुणांबाबत हरकत, आक्षेप दि. 13 सप्टेंबर, तसेच 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात कळवावेत. दि. 14 सप्टेंबरनंतर प्राप्त हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा