कृषी विभागातर्फे रब्बीसाठी बियाणे वितरण अर्ज करण्याचे आवाहन
कृषी विभागातर्फे
रब्बीसाठी बियाणे वितरण
अर्ज करण्याचे
आवाहन
अकोला,
दि. 30 : शासनाकडून अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल
अभियान गळितधान्य पीके योजनेत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके, तसेच प्रमाणित
बियाणे वितरण करण्यात येणार आहे.
चालू
वर्षी हरभरा, गहू, जवस , करडई, भूईमूग व मोहरी या पिकांचे महा-डीबीटी प्रणालीद्वारे
बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पीक प्रात्याक्षिके शेतकरी
गटामार्फत राबविली जाणार आहेत.
पीक
प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध
करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणा-या
बियाण्याचा २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे.
या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची
निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या
अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी
पोर्टलवर दि. ६ ऑक्टोबरपर्यंत बियाणे, औषधे व खते या टाईलअंतर्गत शेतकऱ्यांना
अर्ज करता येतील. तरी जास्तीत
जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या
वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत
आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा