वसंतराव नाईक विजाभज महामंडळातर्फे आर्थिक दुर्बलांसाठी विविध योजना

 

वसंतराव नाईक विजाभज महामंडळातर्फे आर्थिक दुर्बलांसाठी विविध योजना

अकोला, दि. 27 विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एच. जी. आत्राम यांनी केले आहे.

वसंतराव नाईक वि. जा. भ. ज. विकास महामंडळ, तसेच उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आणि पैलवान कै. मारूती चव्हाण - वडार आर्थिक विकास महामंडळांतर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना वैयक्तीक कर्ज बँक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना ऑनलाईन  पद्धतीने राबवल्या जात आहेत.  महामंडळाच्या vjnt.in या संकेतस्थळावर त्याचा तपशील पाहता येईल.

त्याचप्रमाणे, बीज भांडवल कर्ज योजना व थेट कर्ज योजना या योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून त्याची अर्ज विक्री (अर्ज किंमत केवळ १० रू.) जिल्हा कार्यालयात सुरू आहे. हे कार्यालय  गौरक्षण रस्त्यावर पॉवर हाऊससमोर वैष्णवी कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावर आहे. संपर्क दूरध्वनी (०७२४) २४५९९३७ आहे.

अर्ज घेताना आधारपत्र, जातीचा दाखला व शिधापत्रिका सोबत ठेवावी. व्यवसायासंबंधित प्रशिक्षण प्राप्त केलेल्या अर्जदारांना, तसेच विधवा, निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येईल. अर्ज थेट अर्जदारालाच दिले जातील व त्याच्याकडूनच स्वीकारले जातील. मध्यस्थामार्फत विक्री, स्वीकृती होणार नाही, असे श्री. आत्राम यांनी सांगितले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम