इव्हीएम व्हिव्हीपॅट यंत्रांबाबत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दाखवली हिरवी झेंडी 10 सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान जिल्हाभरात जनजागृती मोहीम

 






अकोला, दि. १० : आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदान यंत्र वापराबाबत व मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी इव्हीएम व्हिव्हीपॅट यंत्रांबाबत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी(निवडणुक) महेश परांडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे,महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी राजश्री कोलखेडे आदी उपस्थित होते.


10 सप्टेंबर ते दि. 09 ऑक्टोबर दरम्यान जनजागृती मोहीम  जिल्हाभरात राबविण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट, बाळापूर, अकोला, मुर्तिजापूर तसेच उपजिल्हाधिकारी (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयाच्या ठिकाणी इव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे  (इव्हीएम डेमोस्ट्रेशन सेंटर इडीसी) निश्चित करण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दोन मोबाईल व्हॅनद्वारे प्रत्येक गाव, मतदान केंद्र स्थळावर मतदारांना मतदान यंत्रांची (ईव्हीएम व विविपॅट) प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत.  प्रात्यक्षिकांदरम्यान मतदारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारे मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.


जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय ईव्हीएम व विविपॅट जनजागृती व प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक https://akola.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.त्याचप्रमाणे, ही सुविधा सामान्य निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, अकोट, बाळापूर, अकोला, मुर्तिजापूर व उपजिल्हाधिकारी (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहे.  अकोला जिल्ह्यातील सर्व  नागरीकांनी ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे तसेच मोबाईल व्हॅनव्दारे केल्या जाणा-या प्रात्यक्षिकांच्या ठिकाणी मतदान यंत्रांचे अवलोकन करुन प्रत्यक्ष मतदान करण्याचा अनुभव घेता येणार आहे.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम