वसतिगृहांत प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

वसतिगृहांत प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अकोला, दि. १८ : सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहातर्फे करण्यात आले आहे.

अकोला येथे शिक्षण घेत असलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना  टक्केवारीनुसार रिक्त जागांवर प्रवेश देणे सुरू आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org  या संकेतस्थळावर भरता येईल. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न, जातीचा दाखला, आधारपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक प्रत, गुणपत्रिका, रहिवासी दाखला आदी कागदपत्रे जोडावीत. ऑनलाईन अर्जाची प्रिंट कार्यालयात आणून द्यावी. मुलांचे शासकीय वसतिगृह हनुमान वस्तीमधील संतोषी माता देवळाजवळ आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ८३०८०५८८३३ वर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज