पशुवैद्यक संस्थेत 150 अधिका-यांना प्रशिक्षण

 

पशुवैद्यक संस्थेत 150 अधिका-यांना प्रशिक्षण

अकोला, दि. 4 : पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ आणि पशुसंवर्धन विभागातर्फे 150 पशुसंवर्धन अधिका-यांना पशुधन उत्पन्न व क्षमता वाढविण्याबाबत नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले.

कृषीनगरातील पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत हे प्रशिक्षण शिबिर झाले.  प्रशिक्षण कार्यक्रमात 15 सहायक आयुक्त आणि 135 पशुधन विकास अधिकारी असे 150 अधिकारी सहभागी झाले.

 वाढती लोकसंख्या, बदलते जीवनमान आणि जनतेत आरोग्याबाबत जागरूकता यामुळे बाजारात पशु उत्पादनांची मागणी वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत दूध, अंडी, मांस आदी उत्पादने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. जमिनीचे दरडोई कमी होणारे क्षेत्र आणि नगदी पिकांखाली वाढणारे क्षेत्र यामुळे देखील चारा उत्पादनाची समस्या वाढली आहे. वातावरणातील सततचे बदल आणि वाढत्या मागणीमुळे पशुधनावर अधिक उत्पादनासाठी ताण पडत आहे. त्यामुळे मागणीनुसार उपभोक्त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित उत्पादनाचा पुरवठा करणे व पशुकल्याण सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी आदर्श पशुसंवर्धन पद्धतीचा अवलंब होणे गरजेचे आहे, असे विभागाचे उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी सांगितले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावशे, डॉ. अनिल भिकाने, डॉ. कल्पना कारेगावकर, डॉ. नीलेश खराटे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मिलिंद थोरात, डॉ.सुनील वाघमारे, डॉ. गिरीश पंचभाई, प्रशिक्षण समन्वयक डॉ. दिलीप बदुकले, डॉ. मंगेश वड्डे, डॉ. सुहास अमृतकर, डॉ. प्रवीण बनकर, डॉ. कुलदीप देशपांडे आणि डॉ. सारीपुत लांडगे उपस्थित होते.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज