पोस्ट्स

श्री शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

  श्री शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन अकोला, दि. 17 : सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी रोजी अकोला येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम व त्यांच्या जीवनातील उदात्त मानवी मूल्यांची नवीन पिढीमध्ये रूजवणूक व्हावी या हेतूने त्यांच्या अतुलनीय शौर्यावर व कर्तृत्वावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.  दि. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य नाट्यप्रयोग होणार असून, दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. हे  दोन्ही कार्यक्रम जुन्या शहरातील गोडबोले प्लॉटमध्ये शंकरराव खंडेलवाल महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृह येथे सायं. 5 ते रा. 9 या वेळेत होणार आहेत. या मंगलप्रसंगी अधिकाधिक अकोलेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे....

महोत्सवाचा दुसरा दिवस इंडियन आयडल विनर सलमान अली लाईव्ह कॉन्सर्ट *सुमधुर गाण्यांची बरसात*

इमेज
  महोत्सवाचा दुसरा दिवस इंडियन आयडल विनर सलमान अली लाईव्ह कॉन्सर्ट *सुमधुर गाण्यांची बरसात* नरनाळा महोत्सवात इंडियन आयडल विनर सलमान अली लाईव्ह कॉन्सर्टने एकाहून एक सरस अशा सुमधुर गाण्यांची बरसात केली. अजय अतुल यांचे ’देवा श्री गणेशा’ हे गाणे गाऊन सलमानने कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. त्यानंतर ’मेरे रश्के कमर', ’तेरी दिवानी' बरोबरच चित्रपटांचा संगीतमय प्रवास विशद करणारी जुनी व नव्वदच्या दशकातील अनेक सुंदर गाणी सादर केली. यावेळी रसिकांमध्ये जाऊन सलमान अलीने गाण्यांमध्ये सर्वांना सहभागी करून घेतले. रसिकांनीही नाचून गाऊन त्याला साथ दिली. सुमधुर सुरावटीने आसमंत निनादून गेले होते. या संगीतमय वातावरणाने तरुणांबरोबरच ज्येष्ठांनाही ठेका धरायला भाग पाडले. या सुरेल बरसातीत सर्व उपस्थित न्हाऊन निघाले. ०००

नरनाळा महोत्सवाचा दुसरा दिवस_ रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने दुसरा दिवस संस्मरणीय

इमेज
  नरनाळा महोत्सवाचा दुसरा दिवस_ रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने दुसरा दिवस संस्मरणीय ’ *शिवशंभू गर्जना’ने सूर–तालातून जिवंत केली महाराष्ट्रीय संस्कृती व गौरवशाली इतिहास* अकोला, दि. १६ : नरनाळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ’शिवशंभू गर्जना’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जागवला. वीररसपूर्ण गाणी आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांमध्येही उत्साह, जोश संचारला. उपस्थितांनीही दोन्ही हात उंचावून, उभे राहून कलावंतांच्या सुरात सूर मिसळून, स्वतः नाचून गाऊन जोरदार दाद दिली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात निसर्गाधारित पर्यटन उपक्रम, ’मॅराथॉन– एक धाव संवर्धनासाठी', चित्रकला स्पर्धा, पाक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात अभिजित व अमू जाधव यांचा ’शिवशंभू गर्जना’, त्यानंतर आयडॉल विनर सलमान अली यांची लाईव्ह कॉन्सर्ट हा कार्यक्रम झाला. आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, अपर आयुक्त सूरज वाघमारे, उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थित...

नरनाळा महोत्सवानिमित्त विशेष बससेवा

इमेज
  नरनाळा महोत्सवानिमित्त विशेष बससेवा अकोला : एस. टी. महामंडळातर्फे अकोला, बाळापूर आणि मुर्तिजापूर येथून नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाच्या पोपटखेड येथील मुख्य कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.   या तिन्ही शहरांत एस. टी. स्थानकातून आज दु. 4 वा. विशेष गाड्या सोडल्या जातील.     महोत्सवात निसर्ग पर्यटनावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे तिन्ही दिवस सकाळी 6 ते सायंकाळी 6 दरम्यान ट्रेकिंग, जंगल सफारी, बोटिंग, नरनाळा किल्ला सफारी असे निसर्गपर्यटनाधारित कार्यक्रम होतील. दि. 16 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता महिला व पुरूषांसाठी ‘मॅरेथॉन- संवर्धनासाठी धाव’ होणार आहे. त्यासाठी अकोट फॉरेस्ट डेपो ते श्री संत गजानन महाराज विहीर फाटा असे साधारणत: 12 किमी अंतर असेल. चित्रकला स्पर्धा दि. 16 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 2 दरम्यान विहीर फाटा परिसरात होईल व याच दिवशी दुपारी २ वाजता शहानूर येथे पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव छायाचित्रण स्पर्धाही आयोजिण्यात आली आहे. सांस्कृति...

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ महोत्सवातून पर्यटन विकासाला चालना मिळेल पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

इमेज
  अकोला, दि. १५ : स्थानिक स्तरावर रोजगार व पूरक व्यवसाय वाढण्यासाठी पर्यटन क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. गौरवशाली इतिहास व समृद्ध वनवैभव लाभलेल्या  नरनाळा परिसरात पर्यटन विकासाच्या अनेक शक्यता आहेत. त्याला नरनाळा महोत्सवातून चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज व्यक्त केला. नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचा  शुभारंभ  पालकमंत्री ॲड.  फुंडकर यांच्या हस्ते पोपटखेड रस्ता, अकोट येथे झाला. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, अकोट नगराध्यक्ष माया धुळे, माजी आमदार संजय गावंडे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, श्रीमती गीता परदेशी, उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, पोपटखेडचे सरपंच विजय तायडे आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, नरनाळा परिसरातील आदिवासी बांधव,  शेतकरी बांधव आदींना रोजगार, पूरक व्यवसाय पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. त्यासाठी नरनाळा पर्यटन क्षेत्रात के...

नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

  नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन अकोला, दि. 14 : नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव उद्यापासून (दि. 15) दि. 17 पर्यंत होणार आहे. महोत्सवात साहसी खेळ, वनपर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मंगळवारी भव्य कवीसंमेलन व मुशाय-याचे आयोजन करण्यात आले आहे.   पोपटखेड रोड येथील श्री गजानन महाराज विहीर संस्थान परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यात दि. 17 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. भव्य कवीसंमेलन व मुशायरा होणार आहे. प्रसिद्ध मराठी कवी गोपाळ मापारी, विठ्ठल कुलट, विजय सोसे, गजानन मते, मंगेश वानखडे त्याचप्रमाणे, हास्य कवी अकिल साहिल, जमीर अहमद जमीर, राहिल रब्बानी अशा मराठी व हिंदी कवींचा संमेलनात समावेश असेल. जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध कवी साबीर मुस्तफाबादी हे निवेदन करणार आहेत. अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन  करण्यात आले आहे. ०००

नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

  नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन अकोला, दि. 14 : नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव उद्यापासून (दि. 15) दि. 17 पर्यंत होणार आहे. महोत्सवात साहसी खेळ, वनपर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मंगळवारी भव्य कवीसंमेलन व मुशाय-याचे आयोजन करण्यात आले आहे.   पोपटखेड रोड येथील श्री गजानन महाराज विहीर संस्थान परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यात दि. 17 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. भव्य कवीसंमेलन व मुशायरा होणार आहे. प्रसिद्ध मराठी कवी गोपाळ मापारी, विठ्ठल कुलट, विजय सोसे, गजानन मते, मंगेश वानखडे त्याचप्रमाणे, हास्य कवी अकिल साहिल, जमीर अहमद जमीर, राहिल रब्बानी अशा मराठी व हिंदी कवींचा संमेलनात समावेश असेल. जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध कवी साबीर मुस्तफाबादी हे निवेदन करणार आहेत. अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन   करण्यात आले आहे. ०००

टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा

    टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा   अकोला, दि. 13 : टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत 9 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रवर डाक अधिक्षक रामी रेड्डी यांनी केले आहे.   ही स्पर्धा दि. 8 मार्चला होईल. शालेय स्तरावरही स्पर्धेचे 7 मार्चला आयोजन केले जाणार आहे.  इंग्रजी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत पत्र लिहीता येईल. कमाल शब्दमर्यादा ८०० आहे.  इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज २५ फेब्रुवारीपर्यंत प्रवर अधिक्षक विभागीय टपाल कार्यालय, अकोला या कार्यालयास जमा करावे. सर्कल स्तरावर 25 हजार, 10 हजार व 5 हजार रू. आणि प्रमाणपत्र अशी बक्षीसे आहेत. राष्ट्रीय स्तर 50, 25 व 10 हजार रू. अशी पहिली तीन बक्षीसे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची आवड निर्माण होण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ००  

श्री गुरु तेग बहादुर यांचे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रम

    श्री गुरु तेग बहादुर यांचे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष   नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रम अकोला ,   दि. १३ :    ‘ हिंद दी चादर ’   श्री गुरु तेग बहादुर सहिब जी यांच्या 350 वी शहिदी   समागम शताब्दी   महोत्सवानिमित्त नवी मुंबई येथील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजिण्यात आला आहे.  त्यानिमित्त शासनातर्फे विविध जिल्ह्यात अनेक उपक्रम घेण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी नागपूर व नांदेड येथे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडले असून ,   आता खारघर येथे होणारा हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे.  श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी   समागम शताब्दी   वर्षानिमित्त गौरवशाली इतिहास सर्वाना माहित व्हावा , त्यांचे अतुलनीय शौर्य, कार्य व    बलिदान यांचे स्मरण होण्याकरिता महोत्सव घेण्यात येत आहे.  श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे धार्मिक स्व...

श्री शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन

    श्री शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन अकोला, दि. 13 : सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी रोजी अकोला येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम व त्यांच्या जीवनातील उदात्त मानवी मूल्यांची नवीन पिढीमध्ये रूजवणूक व्हावी या हेतूने त्यांच्या अतुलनीय शौर्यावर व कर्तृत्वावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.   दि. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य नाट्यप्रयोग होणार असून, दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. हे   दोन्ही कार्यक्रम जुन्या शहरातील गोडबोले प्लॉटमध्ये शंकरराव खंडेलवाल महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृह येथे सायं. 5 ते रा. 9 या वेळेत होणार आहेत. या मंगलप्रसंगी अधिकाधिक अकोलेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्...