जिल्हास्तरीय लोकशाहीदिन १ जून रोजी
जिल्हास्तरीय लोकशाहीदिन १ जून रोजी
अकोला, दि. २० : जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे
आयोजन दि. १ जुन रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी
कार्यालयात तिस-या माळ्यावरील बैठक कक्षात करण्यात आले आहे.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग
लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे, प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी
तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन तहसील स्तरावर होते. तालुका लोकशाही दिनानंतर एक
महिन्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन उपक्रमासाठी अर्ज करता येतो. लोकशाहीदिनाच्या १५
दिवस आधी अर्ज पाठविणे आवश्यक असते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा