संशोधन अधिकारी अनिल देव यांचा निवृत्तीनिमित्त गौरव

 





अकोला, दि. 8 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी अनिल रामदास देव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. कार्यालयातर्फे त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव सोहळा आयोजिण्यात आला.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. एन. साळुंके अध्यक्षस्थानी होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (मुलींची) प्राचार्य एस. आर. ठोकरे उपस्थित होते.
श्री. देव यांनी कार्यालयीन कामकाजात घेतलेले परिश्रम व विविध उपक्रम राबविण्यात दिलेले योगदान यांचा श्री. साळुंके यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला. श्री. ठोकरे यांनीही त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
श्री. देव यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सांख्यिकी सहायक एन. टी. राखोंडे, मुख्य लिपीक एम. यू. बुटे, किरणताई घोगरे, मनोहर बदरखे यांनीही मनोगत व्यक्त केले. पंकज नागे यांनी सूत्रसंचालन केले. बी. बी. सुलताने यांनी आभार मानले. एन. टी. राखोंडे, एम. यू. बुटे, कु. किरण घोगरे, मनोहर बदरखे, भिमराव मोहाडे व संकेत मानकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण