माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद अकोला जिल्ह्यात ५३४ पैकी ५३४ गावांचा सहभाग

 माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला जिल्ह्यात ५३४ पैकी ५३४ गावांचा सहभाग

 ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम व निरोगी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानास अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण ५३४ गावांपैकी  ५३४ गावांनी या अभियानात सहभाग नोंदवून आरोग्यदायी गाव उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे.

या अभियानांतर्गत गावपातळीवर स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, लसीकरण, माता-बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध, कुपोषण निर्मूलन, तंबाखूमुक्त परिसर, नियमित आरोग्य तपासणी आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामपंचायत, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागामुळे अभियानाला गती मिळाली आहे.

गावांमध्ये आरोग्य विषयक स्पर्धा, स्वच्छता मोहीम, रक्तदाब व मधुमेह तपासणी, पोषण जनजागृती, शाळांमधील आरोग्य शिक्षण तसेच पर्यावरण संवर्धन उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत. “निरोगी गाव – समृद्ध गाव” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे.

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे ग्रामीण भागात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. उर्वरित गावांनीही अभियानात सहभागी होऊन आरोग्य संपन्न गाव घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला यंच्याकडुन  करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण