प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या नोंदणीसाठी शेतक-यांनी पुढे येण्याचे आवाहन
प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या
नोंदणीसाठी शेतक-यांनी पुढे येण्याचे आवाहन
अकोला, दि. २१ : प्राथमिक पतपुरवठा संस्थांना केवळ पीककर्जापुरते मर्यादित
न ठेवता त्यांचे गॅस एजन्सी, औषध दुकाने व डिजिटल सेंटर्स अशा बहुउद्देशीय सेवा केद्रांत
रूपांतर करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणणे असे उद्दिष्ट सहकार विभागाने
निश्चित केले आहे.
तथापि, अजूनही जिल्ह्यात पुरेशा
संस्था स्थापन झालेल्या नाहीत. त्यामुळे यंदा तालुक्यात ९० नवीन संस्था स्थापन करण्याचे
उद्दिष्ट असल्याची माहिती तालुका उपनिबंधक ज्योती मलिये यांनी दिली. या नव्या संस्था
स्थापन झाल्या तर जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत पतपुरवठा पोहोचून आर्थिक समावेशनात
वाढ होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
अधिकाधिक संस्था स्थापन झाल्यास ही चळवळ पुढे जाण्यास मदतच होणार आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी नवीन प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था नोंदणी करून
घेण्याचे आवाहन तालुका उपनिबंधकांनी केले आहे.
अधिक महितीसाठी उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका अकोला, जिल्हा सहकारी
भुविकास बँक, तळ मजला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अकोला ईमेल :
dyr.akola@gmail.com दुरध्वनी क्रमांक ७२४-२४२६७१९
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा