जिल्ह्यात यंदा तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी
जिल्ह्यात
यंदा तीन स्थानिक सुट्ट्या
जिल्हाधिका-यांकडून
आदेश जारी
अकोला, दि. ६ : अकोला
जिल्ह्यात २०२६ या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी
वर्षा मीना यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला.
त्यानुसार रक्षाबंधन
(शुक्रवार, २८ ऑगस्ट), ज्येष्ठागौरी पूजन (शुक्रवार, १८ सप्टेंबर) व लक्ष्मीपूजन (दुसरा
दिवस- सोमवार, ९ नोव्हेंबर) या तीन दिवशी स्थानिक सुट्टी राहील. हा आदेश जिल्ह्यातील
दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि बँका यांना लागू होणार नाही.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा