अ. ज. विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेत प्रवेशाबाबत आवाहन
अ. ज. विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेत प्रवेशाबाबत आवाहन
अकोला, दि. १३ : अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या
विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1
लीमध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूकांसाठी विनामुल्य प्रवेश
अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे, तसेच नजिकच्या
शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत मिळतील.
इतर कोणत्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता प्रकल्प
कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश
अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
देण्यात आली असुन अंतिम तारीख दि. 25 मे आहे.
सदर योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.पालकाने
विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत
प्रत सादर करावी. या योजनेचा लाभ घेउु इच्छिणा-या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक
उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाखच्या आत असणे आवश्यक आहे. (तहसीलदाराचे). इयत्ता 1 ली
प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणा-या विदयार्थाचे पालकानी
प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो
जोडावे.
आदिम जमातीच्या विदयार्थाची तसेच विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्त्या
व दारिद्र रेषेखालील कुटुंबातील अनुसूचीत जमातीच्या विदयार्थ्यांची प्राधान्य देण्यात
येईल. तसे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार
नसावेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकाकडून संमतीपत्र घेण्यात येईल.9. आधार कार्डची झेरॉक्स प्रत विदयार्थांची जोडावी.
निवड केलेल्या विदयार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थित पालकाच्या
व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही
अपुर्ण कागदपत्र असल्यास तसेच खोटी माहीती सादर केल्यास प्रवेश रद्द
करण्यात येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा