प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत मोठ्या कंपन्यांत कामाचा अनुभव : तरुणांसाठी संधी

 

 

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत मोठ्या कंपन्यांत कामाचा अनुभव : तरुणांसाठी संधी

अकोला, दि. ४ : देशातील तरुणांना मोठ्या उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, कौशल्य विकासाला चालना मिळावी आणि रोजगारक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार असून दरमहा विद्यावेतन आणि इंटर्नशिपनंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

अशी आहे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना?

केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. तरुणांना नामांकित मोठ्या कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप मिळणार आहे. यामुळे त्यांना कामाचा अनुभव, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी मदत होईल. योजनेचा उद्देश देशात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा आहे.

आघाडीच्या कंपन्यांत इंटर्नशिपची संधी

देशातील नामांकित व आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्पादन, ऑटोमोबाईल, आयटी, बँकिंग, वित्त, रिटेल आदी क्षेत्रांमध्ये संधी मिळणार आहे. उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाल्याने तरुणांना फायदा होईल. यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. या अनुभवामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

 

कुठे आणि कसा करायचा अर्ज?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. इंटर्नशिप करणा-या उमेदवारांना ९ हजार विद्यावेतन मिळणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले.

 

 पात्रता आणि निकष काय?

वय: २१ ते २४ वर्षे (पदवीधर, पदवी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र).

उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अपात्रता: आयआयटी, आयआयएम, एमबीबीएस, सीए, सीएस किंवा पदव्युत्तर पदवीधारक या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबातील सदस्य पात्र ठरणार नाहीत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण