अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी शाळेत प्रवेश अर्ज करण्याची मुदत २५ मेपर्यंत
अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित
निवासी इंग्रजी शाळेत प्रवेश
अर्ज करण्याची मुदत २५ मेपर्यंत
अकोला, दि. 15 : अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्याकरिता लाभ घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
विनामूल्य अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत मिळतील.
पालकांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातून प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास सादर करावा.
प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी
अंतिम दि.10 मेपर्यंत होती. अर्ज सादर करण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली असुन अंतिम दि.
25 मेपर्यंत राहील.
इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेण्यासाठी अटी व शर्ती खालील प्रमाणे राहतील.
विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाख रू.च्या आत असणे आवश्यक आहे. तसा तहसीलदाराचा दाखला हवा. विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. प्रवेश अर्जासोबत पालकांचे संमतीपत्र आवश्यक. अर्जासह दोन पासपोर्ट छायाचित्र जोडावीत.
विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्त्या व दारिद्र्यरेषेखालील कुटूंबातील
विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांचे
पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसावेत. निवड
केलेल्या विदयार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थित
पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा