तालुका स्तरावर अधिकृत सोनोग्राफी केंद्रे चाळीस इतरत्र सोनोग्राफी होत असल्यास कळविण्याचे आवाहन; बक्षीसाची तरतूद

 

तालुका स्तरावर अधिकृत सोनोग्राफी केंद्रे चाळीस

इतरत्र सोनोग्राफी होत असल्यास कळविण्याचे आवाहन; बक्षीसाची तरतूद

अकोला, दि. ४ : जिल्ह्यातील तालुका स्तर व ग्रामीण भागात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये ४० सोनोग्राफी केंद्रे नोंदणीकृत आहेत. त्याव्यतिरिक्त इतर कुठेही सोनोग्राफी होत असल्यास संबंधितांनी त्याची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी केले आहे.

अवैध गर्भपात किंवा गर्भधारणापूर्व किंवा प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान होत असल्यास टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४४७५ किंवा १०४ वर किंवा https://amchimulgimaha.in वर कळविण्यात यावे. अशा प्रकरणी  संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास खबरी बक्षीस योजनेअंतर्गत माहिती देणा-यास १ लक्ष रू. बक्षीस शासनातर्फे देण्यात येईल, असे डॉ. कुलवाल यांनी सांगितले.

ही आहेत ४० अधिकृत सोनोग्राफी केंद्रे

अकोटमध्ये गीताई हॉस्पिटल, लोखंडे हॉस्पिटल, केला रूग्णालय, श्रीकृपा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गावंडे चिल्ड्रेन हॉस्पिटल, अमृतेष हॉस्पिटल, वानखडे हॉस्पिटल, अकोट ग्रामीण रूग्णालय, श्री सिद्धीविनायक सोनोग्राफी क्लिनीक, विदर्भ सोनोग्राफी सेंटर, तालुका व्हेटरनरी मिनी पॉलिक्लिनीक, श्री हॉस्पिटल मॅटर्निटी अँड चाईल्ड केअर, धांडे हॉस्पिटल, विघ्नहर्ता डायग्नोस्टिक, बोचे हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, अकोट सीटी स्कॅन एलएलपी ही अधिकृत केंद्रे आहेत.

मूर्तिजापूरमध्ये श्रीमती सुशीलादेवी शर्मा मॅटर्निटी अँड नर्सिंग होम, टावरी रूग्णालय, तालुका व्हेटरनरी मिनी पॉलिक्लिनीक, मोहिनी रूग्णालय, विठाई डायग्नोस्टिक सेंटर, मूर्तिजापूर उपजिल्हा रूग्णालय, मालती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (तूरखेड), मूर्तिजापूर सिटी स्कॅन सेंटर, खैरे उम्मत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कृष्णा डायग्नोस्टिक्स, स्व. गोवर्धनराव बायस्कर स्मृती रूग्णालय, शुभंकरोती रूग्णालय, मातृसेवा रूग्णालय, जय सोनोग्राफी आणि एक्स रे केंद्र आदी अधिकृत केंद्रे आहेत.

बाळापूरमध्ये तालुका व्हेटरनरी मिनी पॉलिक्लिनीक, कोकिळाबेन अंबानी रूग्णालय (रिधोरा), तायडे डायग्नोस्टिक सेंटर, नालिंदे डायग्नोस्टिक (वाडेगाव), तेल्हा-यात नारायण हॉस्पिटल आणि ग्रामीण रूग्णालय, त्याचप्रमाणे, बार्शिटाकळी येथे लहाने रूग्णालय आणि पातूर येथे तालुका व्हेटरनरी मिनी पॉलिक्लिनीक व नालिदे डायग्नोस्टिक ही अधिकृत केंद्रे आहेत.

या केंद्रांव्यतिरिक्त अन्यत्र सोनोग्राफी होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन डॉ. कुलवाल यांनी केले.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण