पीएम इंटर्नशीप योजनेत ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’मध्ये प्रशिक्षण

 

पीएम इंटर्नशीप योजनेत ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’मध्ये प्रशिक्षण

अकोला, दि. 26 : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना राबविण्यात येत आहे.

 

भारतातील पहिल्या ५०० नामांकित कंपन्यामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन त्यांचे कौशल्य विकसित करणे हा त्याचा उद्देश आहे. अकोला जिल्ह्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अकोला या कार्यालयाच्या वतीने पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन दि. २९ मे २०२६ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, २ रा माळा, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे केले आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा चाकण (पुणे) या नामांकित कंपनीने त्यांच्याकडील प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (पीएमआयएस) अंतर्गत प्रशिक्षण संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या मेळावाद्वारे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवाराच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येऊन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येऊन नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
योजनेचे निकष व पात्रता :- वयोमर्यादा १८ ते २५ वर्ष (अर्ज करण्याच्या तारखेनुसार), शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी, आय टी आय, डिप्लोमा व कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार पात्र असतील, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२ लाख पेक्षा रुपयांपेक्षा जास्त नसावे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन कंपनीकडून ९ हजार ५५ रुपये असे एकुण १८ हजार ५५ रुपये व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जावून आपली नोंदणी पूर्ण करावी.
 pminternship.mca.gov.in त्याचप्रमाणे https://tinyurl.com/bd&hb&ww या लिंकवरील गुगल फॉर्म भरुन आपली मुलाखत निश्चीत करण्यात यावी. दि. २९ मे २०२६ रोजी जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन मुलाखत सत्राकरीता आपले बायोडाटा, शैक्षणीक कागदपत्रे, तसेच पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे मेळाव्यासंबंधीत अधिक माहिती करिता या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. ०७२४ २४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८ / ९४२१४२५०६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्तांनी केले.

 

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन