क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
अकोला, दि. २९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती, अकोला येथे विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वसतीगृहात इयत्ता ८ वी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी निवास, भोजन, अभ्यासिका आदी सर्व सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात.
वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दि. २५ मे २०२६ पासून सुरू झाली आहे. शालेय विभागातील (इयत्ता ७ वी उत्तीर्ण) विद्यार्थिनींनी दि. ३० जून पर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी दि. १५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.
अर्ज करण्यासाठी https://hmas.mahait.org ही लिंक उपलब्ध असून, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची झेरॉक्स प्रत तसेच सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती वसतीगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वसतीगृहाच्या गृहपाल आर. जे. लेंडे यांनी विद्यार्थिनींनी व पालकांनी पुढील क्रमांकावर (९४२०४३३९७४, ९५६१३१६०१६, ७४९९६०११६२) संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा