अकोला व कौलखेड मंडळासाठी आज समाधान शिबिर

 

 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

अकोला व कौलखेड मंडळासाठी आज समाधान शिबिर

अकोला, दि. १४ : अकोला तालुक्यातील अकोला व कौलखेड मंडळासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर उद्या, शुक्रवार (१५ मे) सकाळी १० वा. नियोजनभवनात होणार आहे.

अकोला तालुक्यात मार्चपासून १२ महसूल मंडळ मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन होत आहे. नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या प्रश्नांचे निराकरण, तक्रारी निकाली काढणे, दाखले वितरण, फेरफार निकाली काढणे, गाव दफ्तर अद्ययावत करणे आदी विविध कामे पूर्ण केली जातील. अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन