जीडीसी अँड ए परीक्षा २६ ते २८ मे दरम्यान

 

जीडीसी अँड ए परीक्षा २६ ते २८ मे दरम्यान

अकोला, दि. २६ - सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत गव्ह. डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकौंटन्सी (जी.डी.सी. अॅन्ड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा अकोला येथे घेण्यात येत आहे. तशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील १९१ परीक्षार्थी उपस्थित राहणार आहेत. ही दि. २६, २७ व २८ मे रोजी खंडेलवाल ज्ञानमंदिर शाळा, श्री. इंदिरादेवी मोहनलाल खंडेलवाल स्मृती विद्यालय, अकोला, विजय गृहनिर्माण संस्था, गोरक्षण रस्ता, अकोला असा आहे. सदर परीक्षेची वेळ सकाळी १० ते १ व दु. २ ते सायं.५ वा. पर्यंत अशी आहे.

 

ज्या परीक्षार्थीचे प्रवेश पत्र तांत्रिक अडचणीमुळे डाऊनलोड होऊ शकले नाही, त्यांनी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपेक्षा किमान एक तास अगोदर सदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. मुख्यालयाकडून प्राप्त उपस्थिती पत्रकावरुन व परीक्षार्थीचे छायाचित्र ओळखपत्रावरुन पडताळणी करुन परीक्षार्थीना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल, तरी सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन