जलयुक्त शिवार अभियान २.० पालकमंत्र्यांच्या हस्ते चांगेफळ येथे कोल्हापुरी बंधा-याचे भूमिपूजन ग्रा. पं. कार्यालय, पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण
जलयुक्त शिवार अभियान २.०
पालकमंत्र्यांच्या हस्ते चांगेफळ येथे कोल्हापुरी बंधा-याचे भूमिपूजन
ग्रा. पं. कार्यालय, पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण
अकोला, दि. १ : जलयुक्त शिवार अभियान २.० द्वारे महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. चांगेफळ येथे मोर्णा नदीवर प्रस्तावित कोल्हापुरी बंधा-यामुळे गावासाठी सिंचनाची सोय निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
अकोला तालुक्यातील चांगेफळ येथे कोल्हापुरी पद्धत बंधा-याचे भूमिपूजन, तसेच ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान शासकीय यंत्रणा व ग्रामस्थ, शेतकरी यांच्या समन्वयाने राबविले जात असून, महाराष्ट्राला शाश्वत सिंचनाकडे नेणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे. बंधा-यामुळे गावात पाणी उपलब्धता वाढून पेयजलाबरोबरच सिंचनासाठीही लाभ होणार आहे. कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत. बंधा-याचे संचलन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी स्थानिकांची देखरेख व योगदानही आवश्यक आहे. आमदार श्री. सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
चांगेफळ येथील बंधा-याचे काम आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार २.० अंतर्गत मंजूर आहे. कामाची किंमत व मंजूर निधी १ कोटी ६४ लक्ष रू. आहे. या बंधा-याची लांबी २३ मीटर असेल. बंधाऱ्यावरील रस्त्याची रुंदी ३.५० मीटर व पाणीसाठ्याची उंची २ मीटर, बंधाऱ्यातील एकूण पाणीसाठा ९९.८८ स.घ.मी. असेल. सिंचन क्षमता २६ हेक्टर असेल. बंधाऱ्यातील गाळे संख्या एकूण ६ आहे.

.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा