मुख्य टपाल कार्यालयाची वेळ आता सायं. साडेसातपर्यंत
मुख्य टपाल कार्यालयाची वेळ आता
सायं. साडेसातपर्यंत
अकोला, दि. ४ : नोकरदार, व्यावसायिक
व विद्यार्थ्यांना कार्यालयीन वेळेतील अडचण, तसेच तीव्र तापमान लक्षात घेऊन बसस्थानकासमोरील
अकोला मुख्य टपाल कार्यालयाची वेळ सायंकाळी ७.३० वा. पर्यंत वाढविण्यात आली आहे.
टपाल सेवा संचालक डॉ. सुधीर जाखेरे
यांच्या मार्गदर्शनात हा बदल करण्यात आला आहे. या विस्तारित वेळेत बचत खात्यातील व्यवहार,
नवीन खाते उघडणे, पोस्टाच्या सर्व बचतसंबंधीची कामे होतील. नोकरदार व इच्छूकांना कामावरून
घरी परतताना आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती प्रवर
डाकपाल श्रीमती संगीता यांनी दिली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा