जर्मनीमध्ये ‘शिका आणि कमवा’ची सुवर्णसंधी आकर्षक विद्यावेतन; नोकरीचीही संधी

 

 

 https://bit.ly/४eTeqiA

जर्मनीमध्ये ‘शिका आणि कमवा’ची सुवर्णसंधी

आकर्षक विद्यावेतन; नोकरीचीही संधी  

अकोला, दि. २० : राज्य शासनाच्या महाराष्ट्र फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अ‍ॅडव्हांसमेंट उपक्रमांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी मॅजिक बिलियन यांच्या संयुक्त सहकार्याने युवक-युवतींसाठी जर्मनीमध्ये शिक्षणासह रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

‘शिका आणि कमवा’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘अँप्रेंटिसशिप) कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना जर्मनीमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष कामाच्या अनुभवा सोबतच आकर्षक मानधन मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील कुशल व होतकरू युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, रोजगार आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणासोबत रोजगार मिळविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये -  कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना दोन पद्धतींनी प्रशिक्षण दिले जाणार असून यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगद्वारे प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव व थेअरी क्लासद्वारे शिक्षणाचा समावेश राहणार आहे. फूड प्रोसेसिंग (अन्न प्रक्रिया), लॉजिस्टिक्स व सप्लाय चेन, तांत्रिक ट्रेड्स (मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, एचव्हीएसी, प्लंबिंग) व मेटल बिल्डर व मशीन ऑपरेटर इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा सुमारे जर्मनी चलनानुसार १ हजार ४८ युरो (भारतीय चलनानुसार अंदाजे ₹९४,००० ते ₹९५,०००) इतके स्टायपेंड मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना शिक्षणासोबतच आर्थिक आधारही मिळणार आहे. जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

पात्रता निकष- वय: १८ ते २८ वर्षे. लिंग: पुरुष व महिला दोन्ही पात्र. शैक्षणिक पात्रता: किमान १२वी उत्तीर्ण, काही तांत्रिक क्षेत्रांसाठी गणित विषय अनिवार्य, आयटीआय / डिप्लोमा धारकांना प्राधान्य. भाषा पात्रता: जर्मन भाषा बी1 स्तर आवश्यक, जर्मन भाषा प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना जर्मनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळेल. प्रारंभीचे वेतन दरमहा जर्मन चलनानुसार २२०० युरो (भारतीय चलनानुसार सुमारे ₹२ लाखांपेक्षा अधिक) इतके असणार आहे. तसेच भविष्यात जर्मनीमध्ये परमनंट रेसिडेन्सी (पी.आर.) मिळविण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.  

इच्छुक उमेदवारांना जर्मनीचे विमान तिकीट, रिझ्युम तयार करण्यासाठी मार्गदर्शन, मुलाखत प्रशिक्षण, व्हिसा प्रक्रियेस सहाय्य, जर्मनीमध्ये पोहोचल्यानंतर ६ महिन्यांपर्यंत सहकार्य व मार्गदर्शन इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  

या कार्यक्रमासाठी नोंदणी करताना उमेदवारांना सुरुवातीला केवळ ₹४५ हजार भरावे लागतील. त्यानंतर उमेदवारांना कंडीशनल ऑफर लेटर प्रदान करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना भारतातच जर्मनी भाषा शिकण्याची संधी प्राप्त होईल. तो कालावधी १२ महिन्यांचा असेल.  

सदर कार्यक्रम शुल्क २.५ लाख असून सुरुवातीला ४५ हजार भरून जर्मनीकडून अंतिम ऑफर लेटर प्राप्त झाल्यानंतर उर्वरित शुल्क भरायचे असून त्यासाठी ₹२.५ लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

इच्छुक उमेदवारांनी https://bit.ly/४eTeqiA   या लिंक वर आपली संपूर्ण माहिती भरावी.  

जर्मनीसारख्या प्रगत देशामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार मिळविण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी असून राज्यातील कुशल युवकांसाठी हा कार्यक्रम करिअरला नवी दिशा देणारा ठरणार असून जागतिक स्तरावर करिअर घडू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील पात्र युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.  

 

 

🚨  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?