वेध विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिका-यांकडून पूर्वतयारीचा आढावा
अकोला, दि. १२ : निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने समन्वय अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली.
निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, न. प. प्रशासन अधिकारी विश्वनाथ वडजे, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, श्रीनिधी वाजपेयी आदी उपस्थित होते.
अचूक, अद्ययावत व पारदर्शक मतदार यादी तयार करणे ही लोकशाही प्रक्रियेची अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षण, नियोजन आदी बाबींच्या अनुषंगाने मनुष्यबळ व इतर यंत्रणा सुसज्ज असावी. समन्वय अधिका-यांनी संनियंत्रण व समन्वयनाची जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
मयत, दुबार, कायम स्थलांतरितांची नावे वगळणे, मॅपिंग, उपलब्ध मनुष्यबळ, प्रशिक्षक, प्रशिक्षण, ‘बुक अ कॉल’ उपक्रम, पुनरीक्षण फॉर्म, अपेक्षित कामे आदी विविध बाबींविषयी यावेळी चर्चा झाली. श्री. परंडेकर यांनी सादरीकरण केले.
०००

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा