‘आधुनिक दधीचि’ ग्रंथाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन स्व. वसंतराव कसबेकर यांचे जीवनकार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर


 




‘आधुनिक दधीचि’ ग्रंथाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

स्व. वसंतराव कसबेकर यांचे जीवनकार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी

-        पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

अकोला, दि. १५ : स्व. वसंतराव कसबेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य नि:स्वार्थपणे राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला वाहिले. त्यांच्या समर्पित जीवनाची ‘आधुनिक दधीचि’ ही गाथा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.  

आदर्श संस्कार मंडळातर्फे प्रकाशित, तसेच प्रा. सुरेश कुलकर्णी व डॉ. निशिकांत देशपांडे यांनी लिहीलेल्या ज्येष्ठ संघ प्रचारक स्व. वसंतराव कसबेकर यांच्या जीवनकार्यावरील ‘आधुनिक दधीचि’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालयात झाले, त्यावेळी ते बोलत होते. संघाचे विदर्भ कार्य कार्यवाह अतुल मोघे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर, प्रदीप जोशी, नरेंद्र देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, स्व. कसबेकर यांनी कुठलीही साधनसामग्री हाताशी नसताना प्रतिकुल परिस्थितीतही दृढ निश्चय ठेवून अनेक संस्थांची उभारणी केली. आज या सर्व संस्था नावारूपाला आल्या आहेत. कुठलाही स्वार्थ न बाळगता त्यांनी आपले सर्व आयुष्य राष्ट्रकार्यात खर्ची घातले. त्यांचे चरित्र पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरणारे आहे. लेखकांनी अत्यंत कष्टपूर्वक माहिती संकलित करून पुस्तकाची निर्मिती केली आहे, असेही त्यांनी सांगितले. श्री. मोघे यांनी अध्यक्षीय भाषण केले.

पुस्तकासाठी योगदान देणा-या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला. स्व. वसंतराव कसबेकर स्मृती संकलन समितीचे सदस्य, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण