‘बीएलओं’ना सहकार्य करा : मतदार नोंदणी अधिकारी

 ‘बीएलओं’ना सहकार्य करा : मतदार नोंदणी अधिकारी

अकोला, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 'विशेष सखोल पुनरीक्षण' कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, नावात चूक दुरूस्ती करणे, मयत/स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे यांसारखी महत्त्वाची कामे केली जात आहेत.

या अनुषंगाने आपल्या घरी येणारे बीएलओ  हे शासन नियुक्त कर्मचारी असुन त्यांनी विचारलेली माहिती देणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनातर्फे दि. 30 मे ते 2 जून या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण कागदपत्रांसह शिबिराला भेट देऊन आपले मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी केले आहे.

 

नागरिकांकडून घेतली जाणारी माहिती पूर्णपणे सुरक्षित असून ती केवळ निवडणूक प्रक्रियेसाठीच वापरली जाते. तरी बीएलओ यांना ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड) आणि कुटुंबाची योग्य माहिती देऊन सहकार्य करावे

 नागरिकांनी आपली किंवा कुटुंबाची योग्य माहिती न दिल्यास अथवा टाळाटाळ केल्यास, कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून सदर मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाईल.

माहिती देण्यास टाळाटाळ करणे किंवा चुकीची माहिती देणे हे निवडणूक नियमांनुसार अडथळा ठरू शकते.

तरी सर्वांनी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन