जनगणनेच्या बनावट अर्जापासून सावधान

जनगणनेच्या बनावट अर्जापासून सावधान 

जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे.

#FactCheck #DGIPRFactCheck जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. १. स्व नोंदणी - नागरिक se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला 'SE ID' त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल. २. थेट माहिती देणे - दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल. सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. #जनगणना२०२७ #Census2027 #SelfEnumeration #IndiaCensus2027


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण