जिल्ह्यात कापूस बियाणे विक्रीचा शुभारंभ

 






जिल्ह्यात कापूस बियाणे विक्रीचा शुभारंभ

अकोला, दि. १५ : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कापूस बियाणे विक्रीचा शुभारंभ खासदार अनुप धोत्रे, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत आज झाला.

येथील ॲग्रो असोशिएटस् येथे शासकीय नियमानुसार कापूस बियाणे विक्रीचा शुभारंभ झाला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी तुषार जाधव, मोहन सोनोने,  डॉ .तुषार  जाधव,  प्रविण  भोर, सतिश  दांडगे, सुधाकर खंदारे, संजय  गाढे यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा सपत्निक सन्मानही यावेळी करण्यात आला.

शेतकरी बांधवांना दर्जेदार बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावे. कुठेही गैरप्रकार घडता कामा नये, असे निर्देश खासदार श्री. धोत्रे यांनी दिले.

या वेळी जिल्हाधिकारी   यांनी कापूस  बियाणाचा मुबलक  साठा  उपलब्ध आहे  असे  सांगितले . तसेच  बियाणे    खताचा  कुठे  साठेबाजी    काळाबाजार  होत  असल्यास   जिल्हास्तरीय  भरारी  पथक    तालुका  स्थरीय  भरारी  पथक  यांच्याशी  संपर्क  करावा  असे  आवाहन  करण्यात  आले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण