अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे व्हाटस ॲप चॅटबॉट सेवा - रोहित बारस्कर

 

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे व्हाटस ॲप चॅटबॉट सेवा

-        रोहित बारस्कर

अकोला, दि. १४ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक तसेच गट कर्ज योजनांतील लाभार्थ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व्हाटस ॲप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक रोहित बारस्कर यांनी दिली.

 

लाभार्थ्यांसाठी व्हाटस ॲप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली असून व्हाटस ॲपमध्ये अर्जाची स्थिती, मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर सेवा "एक क्लिक" या संकल्पनेअंतर्गत विकसित करण्यात आली असून, लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जासंबंधित माहिती व विविध प्रक्रियांची स्थिती आता थेट व्हाटस ॲप वरून तत्काळ प्राप्त होणार आहे.

 

व्हाटस ॲप चॅटबॉट सुविधेद्वारे लाभार्थ्यांना पुढील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत :

 

८९७६८५५९२१ या क्रमांकावर "Hi" असे लिहिल्यास Menu / पर्याय उपलब्ध होतील. या पर्यायानुसार खाली दिलेले पर्याय समोर येतील. त्यापैकी संबंधित पर्यायाची निवड करून पुढे जावे.

 

महामंडळ व योजनांची माहिती.

 

नवीन नोंदणी संदर्भातील मार्गदर्शन.

 

पात्रता प्रमाणपत्र  स्थिती व डाउनलोड सुविधा.

 

बँक कर्ज मंजुरी  स्थिती.

 

व्याज परतावा दावा  स्थिती.

 

तांत्रिक अडचणी नोंदविणे व त्यासंबंधित Ticket Generation सुविधा.

 

या सर्व सेवा OTP आधारित सुरक्षित पडताळणी करून लाभार्थ्यांना सुविधा मिळणार आहेत.

 

स्वयं नोंदणी, बँक मंजुरी व व्याज परतावा दावा करिता मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण व्हिडिओ WhatsApp Bot मध्ये उपलब्ध असून विभागीय कार्यालय / जिल्हा कार्यालयाची संपर्क माहिती एका क्लिकवर प्राप्त होणार आहे.

सदर प्रणालीमुळे लाभार्थ्यांना कार्यालयीन भेटी कमी होऊन ऑनलाईन सुविधेमुळे अर्ज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व गतीमानता येईल. शिवाय, लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती "एकाच चॅटमध्ये उपलब्ध होत असल्याने वेळ व खर्चाची बचत होणार आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांचे अनधिकृत एजंट वरील अवलंबित्व कमी होईल.

 

महामंडळामार्फत यापूर्वीच लाभार्थ्यांच्या सोयीसाठी अधिकृत मोबाईल ॲपदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व लाभार्थ्यांनी उपलब्ध डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने घ्यावा, यासोबतच ॲपमार्फत सुविधा लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

अधिक सोईसाठी महामंडळाच्या वेब प्रणालीवर लाभार्थ्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी "व्यवसायवर्धन" टॅब सुरू करण्यात आलेला असून, लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी त्यांची उत्पादने व सेवा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने महामंडळाच्या प्रणालीवर प्रसिद्ध करावीत, ज्यामुळे त्यांच्या सेवा व उत्पादनांची माहिती अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचेल. याच माध्यमातून लाभार्थ्यांना विक्री व खरेदीचे व्यासपीठ तयार करण्याची ई मार्केट प्लेसची सुविधा भविष्यात उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायात वृद्धी होण्यास मदत होईल.

 

दरम्यान, भविष्यात या माध्यमातूनच अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्याबाबत महामंडळ स्तरावर कार्यवाही सुरू असून, लाभार्थ्यांना अधिक सुलभ व गतिमान सुविधा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

 

सर्व लाभार्थ्यांनी व्हाटस ॲप चॅटबॉटचा वापर करून डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण