अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार

अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना

उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार

आयोगाकडून राष्ट्रीय मतदारदिनी पुण्यात होणार गौरव

अकोला, दि. 22 : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय मतदारदिनी (25 जानेवारी) पुणे येथील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

06- अकोला लोकसभा मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार काम पाहिले. त्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केला आहे.

त्याबद्दल अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी अनिता भालेराव आदींनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिका-यांचे अभिनंदन केले. ‘निवडणुकीच्या काळात सर्व अधिकारी- कर्मचा-यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन निवडणुकीची प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडली. सर्वांच्या योगदानामुळे जिल्ह्याला पुरस्कार प्राप्त झाला’, असे सांगून जिल्हाधिका-यांनी सर्व सहका-यांचे अभिनंदन केले.

०००


 

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. राज्य सरकार लोगो की नशा छुड़वाने की दवाईयां बनवाने वाले कंपनियों को सपोर्ट करके,,उससे भी अरबों खरबों रुपे कमा रही है,, और दूसरी और शराब गांजा सिगरेट तंबाकू जैसे उत्पादन कंपनियों के साथ भी मिली हुई है,,क्योंकि राज्य सरकार अच्छी तरह से जानती है कि लोग इसका सेवन अवश्य करेंगे,, और इस उत्पादन की भारत में सबसे ज्यादा विक्री होगी,खपत होगी,, तो उस कंपनियों से कुलमिलाकर सरकार को फायदा ही होने वाला है,इसीलिए राज्य सरकार कभी नहीं चाहेगी कि जनता स्वस्थ सुखी नशा मुक्ति को अपनाए,,क्योंकि इसमें राज्य सरकार के आय में वृद्धि नहीं होगी,,इसीलिए राज्य सरकार ,,, ब्यांड भी बजाती है, और पुंगी भी,,इसीलिए राज्य सरकार की कुटनीतियो को आम जनता नही समझ सकती,,,, जय श्री राम

      हटवा
  2. आदरणीय जिल्हाधिकारी सर आपले हार्दिक अभिनंदन आम्हाला अभिमान आहे, आपण आमच्या अकोला जिल्हाचे जिल्हाधिकारी लाभले

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा