प्रधानमंत्री स्वामित्व योजना मिळकत सनद लाभार्थ्यांना वितरीत जिल्हयात २ हजार ११६ लाभार्थ्यांना सनदेचे वितरण











 


अकोला, दि १९: प्रधानमंत्री स्वामित्व योजना ग्रामीण भागातील जमिनींचे सर्वेक्षण आणि मॅपिंग करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत असून स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आज देशातील ५० लाखांहून अधिक घरमालकांना मिळकत सनदेचे ई-वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सनद  वाटप कार्यक्रमात कळमेश्वर येथील लाभार्थ्यांना प्रातीनिधिक स्वरूपात सनद वितरीत करण्यात आली.

यावेळी आ.रणधीर सावरकर,आ.वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जी.प मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक भारती खंडेलवाल, जिल्हा  सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले जी.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी समाधान वाघ,कळंबेश्वर ग्रां.प सदस्य अनिल पाटील आदी उपस्थित होतें. जिल्ह्यातील २२ गावामधील २ हजार ११६ लाभार्थ्यांना भूमी अभिलेख विभागामार्फत सनदेचे वितरण करण्यात आले.

गरजूंना रहिवासी घरांसाठीचे मिळकतपत्रक सुलभपणे मिळवून देणे हा योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान, प्रगत नकाशा तंत्राचा उपयोग केला जातो.जिल्हयात ७४० गावाचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण झालेले असून हजारो सनदेचे वितरण करण्यात येत आहे.मालमत्तेचा अधिकृत पूरावा म्हणून मिळकत पत्रिका मिळणार आहे,विविध बॅंक, पतसंस्था कर्ज उपलब्धता होणार आहे.जागेचे मालकी हक्क, तंटे, वाद कमी उदभवतील, जमिन खरेदी विक्रि व्यवहारातील फसवणूक टळणार असल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. प्रास्ताविक भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक श्रीमती खंडेलवाल यांनी तर संचालन जया भारती यांनी केले.

आज तेल्हारा तालूक्यातील भोकर,अकोट तालूक्यातील सावरगाव, नेव्होरी बु., नेव्होबी खुर्द, रोहणखेड, रंभापूर बाळापूर तालूक्यातील खिरपूरी बू, खिरपुरी खुर्द ,बोरगाव वैराळे, बारलिंगा, मांजरी,  बार्शिटाकळी तालूक्यातील गोरव्हा, चिचोंली, टेंभी, बोरमळी, पिपंळगाव चांभारे, मूर्तिजापूर तालूक्यातील सोनोरी, टिपटाळा, पातूर तालूक्यातील जांभपूर, भंडारज खुर्द, खामखेड गावातील २ हजार ११६ सनदेचे वितरण करण्यात आले.

 

ग्रामीण भागाच्या सामाजिक,आर्थिक विकासाला चालना

- आमदार रणधीर सावरकर

आ.सावरकर यानी बोलताना स्वामीत्व योजना  महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण भागाच्या सामाजिक,आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.यासोबतच विस्तारित गावठाण योजना झाली पाहिजे त्यासाठी सरपंच, ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन केले.

जिल्हाधिकारी श्री.कुंभार यांनी बोलतांना स्वामीत्व योजनेच्या गावठाणातील सर्व मालमत्ताचे आधूनिक ड्रोनव्दारे सर्वेक्षण होवून प्रत्येक घराचा नकाशा,सीमा व क्षेत्र याबाबत माहीती मिळणार असल्याने याचा निश्चितच फायदा नागरिकांना होणार असल्याचे प्रतिपादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सनद वितरण कार्यक्रमात तेजराव शांताराम रिकामे,भाऊराव निकामे, सुरेश शांताराम निकामे,सुनील भाऊराव निकामे, अर्जुन रावजी इंगळे, पुरुषोत्तम रावजी इंगळे,सुभाष ज्ञानदेव निकामे, रामदास निकामे, सदाशिव महाले, सेवकराम वाघमारे,बंडू नकासकर,रवींद्र निकामे, सुकराम निकामे, ज्ञानदेव वरणकर,बळीराम नाचणकर,शिवराम रौंदळकर, विनोद महाले,श्रीकृष्ण महाले,ओंकार खिरेकर, बाप्पू निकामे, मायावती अरखराव, मालुबाई जोगदंड, नर्मदाबाई कदम तर्फे पंजाबराव कदम ,केशव महाले गणेश चव्हाण, सुमनबाई नकासकर,राहुल इंगळे  यांना सनद वितरीत करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा