विशेष ग्रामसभेद्वारे गावोगाव देणार स्पर्श मोहिमेबाबत माहिती जि. प. सीईओ बी. वैष्णवी
जि. प. सीईओ बी. वैष्णवी
अकोला,
दि. 16 : स्पर्श कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मोहिमेबाबत गावोगाव जनजागृती करण्यासाठी
दि. 26 जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभेत माहिती देण्यात येईल. मोहिमेत दि. 30
जानेवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार
आहेत. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जि. प. मुख्य
कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी आज येथे दिले.
मोहिमेच्या
पूर्वतयारीसाठी बैठक सीईओंच्या दालनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, ग्रामविकास, तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अधिकारी
उपस्थित होते.
श्रीमती
वैष्णवी म्हणाल्या की. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येणार आहे.
दि. 26 जानेवारी रोजी ग्रामसभेद्वारे जनजागृती, जिल्हाधिका-यांच्या संदेशाचे
आवाहन, कुष्ठरोग निर्मूलनाची प्रतिज्ञा आदी कार्यक्रम होईल. सर्व प्रा. आ.
केंद्रे, रुग्णालये, कार्यालये, शाळा, महाविद्यालयात प्रतिज्ञा घेतली जाईल.
जनजागृतीसाठी
शाळांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम घ्यावेत. लवकर
निदान व लवकर उपचाराचे महत्व याबाबत समाजात शास्त्रीय माहितीचा प्रसार करावा. ठिकठिकाणी
आरोग्य शिबिरे घेऊन गरजूंना उपचार मिळवून द्यावेत. जिल्हास्तरीय खुली मॅराथॉन
आयोजित करण्यात येणार असून, त्यात अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळविण्यासाठी
प्रसिद्धी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
अकोला
जिल्ह्यात आजमितीला 130 कुष्ठरूग्ण उपचाराखाली असून, कुष्ठरोग निर्मूलन
मोहिमेद्वारे सातत्याने तपासण्या, उपचार आदी कार्यवाही होत असल्याची माहिती सहायक
संचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा