महिलांनी सुरक्षा विमा व जीवनज्योती विमा योजनेचा लाभ घ्यावा - सीईओ बी. वैष्णवी यांचे आवाहन
महिलांनी
सुरक्षा विमा व जीवनज्योती विमा योजनेचा लाभ घ्यावा
-
सीईओ बी. वैष्णवी यांचे आवाहन
अकोला, दि. 7 : बचत गटाच्या महिला सदस्यांनी
व जिल्ह्यातील महिलाभगिनींनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती विमा योजनेचा
लाभ घ्यावा, असे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी केले.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या
(उमेद) अधिका-यांची व बँकर्सची जि. प. सीईओंच्या दालनात सोमवारी झाली, त्यावेळी त्या
बोलत होत्या. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक
नरेंद्र काकड आदी उपस्थित होते.
बँकांनी मोहिम राबवावी
त्या म्हणाल्या की, उज्ज्वल भविष्यासाठी
नियोजन व सुरक्षितता महत्वाची असते. त्यासाठी महिलाभगिनींनी सुरक्षा विमा व जीवनज्योती
योजनेचा लाभ घ्यावा. सर्व बँक अधिका-यांनी या दोन्ही योजना दि. 14 जानेवारीपर्यंत मोहिम
स्वरूपात राबवून अधिकाधिक महिलांना लाभ
देण्याचे निर्देश श्रीमती वैष्णवी यांनी
दिले.
बँकेत नवीन खाते, बँक कर्ज प्रस्ताव,
व्यक्तिगत कर्ज प्रस्तावांची कामे पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
उमेद अभियानात 13 हजार महिला बचत गटांच्या
माध्यमातून 1 लाख 25 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. महिला सक्षमीकरण व शाश्वत विकासासाठी
उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे, असे श्री. काकड यांनी सांगितले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा