सातकलमी कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यालयांची पाहणी









 

अकोला, दि. २१ : शासनाच्या सात कलमी कार्यक्रमात शंभर दिवसात गतिमान सेवा, स्वच्छ सुंदर कार्यालये, प्रलंबित प्रकरणाचा संपूर्ण निपटारा, नागरिकांना सहज सुलभ भाषेत माहिती मिळेल अशी व्यवस्था आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केली.

सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यालयांना बैठकीद्वारे विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी झाली किंवा कसे याची पाहणी जिल्हाधिकारी विविध कार्यालयांना आकस्मिक भेटी देऊन करत आहेत.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आज पंचायत समिती कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आदी कार्यालयांची पाहणी केली.

प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात लोकांना महिती देण्यासाठी आवश्यक माहितीपर  फलक लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

प्रत्येक अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कार्यालय व टेबलावर जॉब चार्टबाबत माहिती आवश्यक असावी.
प्रत्येक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आवश्यक आहे. अभ्यागतांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी परिपूर्ण सुविधा असाव्यात.
मुदतबाह्य व अनावश्यक साहित्याचे निर्लेखन करावे.
सर्व कागदपत्रे सहज मिळण्यासाठी अद्ययावत प्रणाली सुरू करावी. कागदपत्रांच्या फाईल, वस्तू आदींसाठी नीटनेटकी व्यवस्था असावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी दिले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे तसेच विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा