जागतिक धुम्रपान विरोधी दिनानिमित्त जनजागृती उपक्रम
जागतिक धुम्रपान विरोधी दिनानिमित्त जनजागृती
उपक्रम
अकोला,
दि. 1 : जागतीक धूम्रपान विरोधी दिन दि. 1 जानेवारीला साजरा करण्यात येतो याचा
प्रमुख उद्देश तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांच्या सेवनामुळे होणारे आजार आणि
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणारे मृत्यू कमी करणे करिता समाजात जनजागृती
करणे हा आहे. या दिनाच्या निमित्ताने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या
व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात जनजागृती
विषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
तंबाखू सेवनामुळे होणारे परिणाम :- तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिण्याचे विकार होतात.
तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा,
फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा,
किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतात. भारतात
तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कँसर (कर्करोग) असलेल्या रूग्णांची संख्या
सर्वांत मोठी आहे. ९०% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कँसर होण्याचे
कारण धूम्रपान आहे.तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्यांचे विकार, ह्दयरोग, छातीत दुखणे, हदयविकाराच्या
झटक्यामुळे अचानक मरण येणे, स्ट्रोक (मेंदूचा विकार),
परिधीय संवहनी रोग (पायाचा गैंग्रीन) हे रोग होतात. तंबाखू हे
क्षयरोग होण्याचे अप्रत्यक्ष कारण आहे. कधी-कधी धूम्रपान करणा-यांमध्ये देखील
टीबी, ३ पट अधिक आढळतो. सिगरेट किंवा बीड़ीचे धूम्रपान,
जितके अधिक, तितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू
शकते.धूम्रपान/ तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा
रक्तपुरवठा कमी करते. ह्यामुळे पायाकडे होणा-या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते
आणि पायात गैंग्रीन होऊ शकते.तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्यांच्या पापुद्र्याला
नुकसान पोहचवते.मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो आणि कुटुंबातल्या
इतर सदस्यांवर देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो.तंबाखू किंवा धूम्रपानामुळे
मधुमेह होण्याची शक्यता जास्त बळावते. तंबाखूपासून दूर राहिल्यास एक
किशोर/किशोरीचा जीवनकाळ 20 वर्षाने वाढू शकेल. तंबाखूचा वापर करणारे किशोर/किशोरी
अंततः यामुळे मृत्युमुखी पडतील.(जवळजवळ एक चतुर्थांश मध्य आयुष्यात किंवा एक
चतुर्थांश म्हातारपणात) भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी
पडणा-यांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचा अंदाज आहे. धूम्रपान/तंबाखूचे स्त्री व
पुरुषांवर दुष्परिणाम होतात. याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारण आहे धूम्रपान/तंबाखूचे
सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर
होते.धूम्रपान/तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता
ढासळते.ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा
धोका वाढतो.ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्यता वाढते, किंवा मूल कमी
वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात,
किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो.तंबाखू सोडण्याचे
शारीरिक तसेच सामाजिक फायदे आहेत.नववर्ष तसेच धूम्रपान विरोधी दिनाचे निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवन स्वत:
करनार नही तसेच इतरांनाही या व्यसना पासुन
दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन असा संकल्प करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी
यांच्यासह विस्तार व माध्यम अधिकारी बाळासाहेब घुगे यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा