राज्य वाङमय पुरस्कारांसाठी 31 जानेवारीपूर्वी प्रवेशिका पाठवा ‘आरडीसी’ विजय पाटील यांचे आवाहन

 

 राज्य वाङमय पुरस्कारांसाठी

31 जानेवारीपूर्वी प्रवेशिका पाठवा

‘आरडीसी’ विजय पाटील यांचे आवाहन

अकोला, दि. 2 : राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे देण्यात येणा-या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी इच्छूकांनी दि. 31 जानेवारीपूर्वी प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड़मय निर्मितीसाठी विविध पुरस्कार दिले जातात.  दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके स्पर्धेसाठी पात्र आहेत.  प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसाधारण किंवा करमणूक शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रवेशिका पूर्ण भरून दोन प्रतीत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकूण 4 विभाग, 35 साहित्य प्रकार आणि 29 लाख रूपयांचा पुरस्कार

चार विभागात 35 साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात एकूण 22 साहित्य प्रकार असून प्रत्येकी 1 लाख रु. प्रमाणे एकूण 22 लाख रूपयांची पुरस्कारांची रक्कम आहे. बालवाङमय विभागात एकूण 6 साहित्य प्रकारात प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.

प्रथम प्रकाशन प्रकारातील एकूण सहा साहित्य प्रकारांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये या प्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. लेखक किंवा प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.

शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नवीन संदेश’ या शीर्षाखाली, तसेच राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :