अकोल्यात भरणार पाच दिवसांची ‘व-हाडी जत्रा’
अकोल्यात भरणार पाच दिवसांची ‘व-हाडी जत्रा’
अकोला, दि. 22 : व-हाडची संस्कृती, खाद्यपदार्थ, ग्रामजीवन यांचे दर्शन
घडविणारी ‘व-हाडी जत्रा’ अकोल्यातील शास्त्री क्रीडांगणात दि. 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीदरम्यान
भरणार आहे.
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान ‘उमेद’तर्फे ‘व-हाडी जत्रा’ हा
मिनी सरस महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित बाजारपेठ
मिळवून देण्यासाठी व या समूहांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात
आला आहे. याबाबत नियोजनासाठी बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली.
ग्रामीण भागातील महिलाभगिनींनी बचत गटाच्या माध्यमांतून तयार केलेली
विविध उत्पादने या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.उपक्रमाचे परिपूर्ण व वैविध्यपूर्ण
नियोजन, व्यापक प्रसिद्धी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.
व-हाडी जत्रेत ग्रामीण कलाकुसर, खाद्यपदार्थ, मसाले व इतर उत्पादनांची
सुमारे 80 दालने असतील. त्याशिवाय प्रत्येक सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
श्री. कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, ग्रामीण विकास यंत्रणा
प्रकल्प संचालक मनोज जाधव, ‘उमेद’चे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा