युवकांना इस्त्रायलमध्ये रोजगाराची संधी

 

युवकांना इस्त्रायलमध्ये रोजगाराची संधी

अकोला दि. 16 : मित्र या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलमध्ये (नॉन वॉर झोन) रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त रोजगारइच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

इस्रायलमध्ये पाच हजार होम बेस्ड हेल्थ गिव्हर वर्कर्सची (घरगुती सहायक) आवश्यकता आहे.  त्यासाठी 25 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. या उमेदवारास इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. भारतीय नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यता प्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

भारतीय नियामक प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरीमधील प्रशिक्षण, नर्सिंग पदविका, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच एएनएम, जीएनएम व बीएससी नर्सिंग शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार पात्र असतील. एकूण मागणीमध्ये 90 टक्के महिलांसाठी आणि 10 टक्के पुरुषांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध आहे.  

जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छूक पात्रताधारक उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता https://maharashtrainternational.com/candidates.aspx  या संकेतस्थळावर जाऊन फॉर कॅन्डिडेड या टॅबवर क्लिक करा आणि अप्लाय हियर या टॅबवर क्लिक करून जॉब डिस्क्रिप्शन वाचावे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला तसेच दुरध्वनी क्रमांक ०७२४-२४३३८४९ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन