प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0: पाणलोट यात्रेद्वारे जनजागर गावोगाव जलसंधारणाची चळवळ निर्माण व्हावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0: पाणलोट यात्रेद्वारे जनजागर

गावोगाव जलसंधारणाची चळवळ निर्माण व्हावी

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 13: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाणलोट विकास कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. गावे जलसमृद्ध होण्यासाठी गावोगाव जलसंधारणाची चळवळ निर्माण व्हावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

मृद व जलसंधारण विभाग हा योजनेचा नोडल विभाग आहे. प्रत्येक गावात जलसंधारण चळवळ निर्माण करून शाश्वत विकासाला चालना देणे हा पाणलोट यात्रेचा उद्देश आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित असून, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर हे सदस्य सचिव आहेत. यात्रेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन नियोजन करण्यात आले आहे.

पाणलोट यात्रेद्वारे गावागावांत जलसंधारण चळवळ उभी करण्यासाठी लोकप्रबोधन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले. जलसंधारण विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित काम करत ही चळवळ यशस्वी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पाणलोट क्षेत्राच्या व्यवस्थापनातून गावे जलसमृद्ध होतील. शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही, तसेच शेतजमिनींना अधिक उत्पादक बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. पाणलोट विकास हा शाश्वत शेती व ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :