ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
अकोला, दि. 22 : नजिकच्या काळात (दि. 4 मार्चपर्यंत) निवडणूक होणा-या
20 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात
आज काढण्यात आली. सोडतीनुसार निश्चित आरक्षणाची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी
जाहीर केली आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती व आरक्षण पुढीलप्रमाणे : तेल्हारा – उमरी
(अनुसूचित जाती महिला), अकोला रूपराव (सर्वसाधारण), अकोट- केळपाणी (अनुसूचित
जमाती महिला), केळपाणी बु. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), मूर्तिजापूर- कव्हळा
(अनुसूचित जमाती महिला), शेलू बाजार (सर्वसाधारण महिला), किनखेड (सर्वसाधारण महिला),
लंघापूर (सर्वसाधारण).
बाळापूर- हिंगणा निंबा (नागरिकांचा
मागासवर्ग प्रवर्ग महिला), शिंगोली (सर्वसाधारण), बार्शिटाकळी-
भेंडीसूत्रक (सर्वसाधारण महिला), चोहोगांव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), पातूर-
सांगोळा (सर्वसाधारण महिला), कोठारी बु. (सर्वसाधारण), आस्टुल (सर्वसाधारण महिला),
भंडारज बु. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), तुलंगा बु. (सर्वसाधारण).
अकोला- आखतवाडा (सर्वसाधारण स्त्री), अनकवाडी
(अनुसूचित जाती), मजलापूर (सर्वसाधारण).
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा