शंकरपट आयोजनाबाबत पशुसंवर्धन विभागाकडून सूचना जारी

 

शंकरपट आयोजनाबाबत

पशुसंवर्धन विभागाकडून सूचना जारी

अकोला, दि. 20 : शंकरपट आयोजनाबाबत जिल्ह्यातून प्रशासनाला अर्ज प्राप्त होत आहेत. आयोजनाच्या नियमांबाबत  जिल्हा पशुसंवर्धन अधिका-यांनी सूचना जारी केल्या आहेत.

 

बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यासाठी आयोजकांनी किमान 15 दिवस आधी विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रांसह करावा. अर्जासह हमीच्या स्वरूपात पन्नास हजार रू. प्रतिभूती ठेवी ठेवणे आवश्यक आहे. यात्रा, जत्रा, उत्सव अशा प्रसंगीच शर्यतीचे आयोजन व्हावे. राजकीय कार्यक्रम, वाढदिवस अशा प्रसंगी आयोजन करू नये.

बैलगाडा शर्यत, शंकरपट, छकडी आदींसाठी धावपट्टी एक हजार मीटरपेक्षा कमी लांबीची असावी. शर्यतीची धावपट्टी अतिशय उतार असलेली, दगड- खडक असलेली, दलदल असलेली, पाणथळीची असू नये. धावपट्टीपुढे बैलगाडीचा वेग मंदावण्यासाठी पुरेशी सपाट जागा ठेवावी. रस्त्यावर किंवा महामार्गावर शर्यती आयोजित करण्यात येऊ नये.

कोणत्याही बैल किंवा वळूचा वापर एका दिवसात तीनपेक्षा अधिक शर्यतीत करू नये. बैलांना धावपट्टीवर आणण्याआधी 30 मिनीटे आराम द्यावा. पुरेशी सावली, चारापाणी असावे. पशुवैद्यकीय आरोग्य प्रमाणपत्र असावे. केवळ एका गाडीवानास बैलगाडा चालविण्याची परवानगी आहे. शर्यतीदरम्यान बैलास दुखापत होईल असे चाबूक, काठी आदी साधन वापरू नये. प्राण्यांच्या, गाडीवानाच्या व प्रेक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांवर आहे. प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध आहे. तसे आढळल्यास आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा