चाचा नेहरू बालमहोत्सवाला सुरूवात



 

चाचा नेहरू बालमहोत्सवाला सुरूवात

अकोला, दि. 9 : बालगृहातील मुलांचे विविध गुणदर्शन, तसेच सांघिक भावना निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा प्रारंभ बुधवारी येथील वसंत देसाई क्रीडांगणात झाला.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी, पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, नायब तहसीलदार शरद आत्राम, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, ॲड. सारिका घिरणीकर, राजेश देशमुख, ॲड. शीला तोष्णीवाल, प्रांजली जयस्वाल, डॉ. विनय दांदळे आदी उपस्थित होते.

विविध खेळांत विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थी  महेश वाडकर, सोहम चव्हाण, तृपांशा जैन, वेदिका खेडकर, कविता इंगळे  आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा, कब्बडी, धाव स्पर्धा घेण्यात आल्या. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांनी बालकांना मार्गदर्शन केले. विशाल राखोंडे यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला. गौरी कांगटे, धनश्री खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.

महोत्सवात उद्या (10 जानेवारी) सांस्कृतिक स्पर्धा व बक्षीसवितरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्ष अधिकारी राजू लाडूलकर यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :