भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

 

 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान

शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

अकोला, दि. 9 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत आंबा, पेरू, संत्रा, कागदी लिंबू, मोसंबी, सीताफळ, आवळा, डाळिंब आदी फळपीक लागवडीचा समावेश आहे. त्यात भरघोस अनुदान उपलब्ध असून, वैयक्तिक शेतक-यांना लाभ देण्यात येतो. शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.  

फळपीकाला तीन वर्षांत अनुक्रमे 50, 30 व 20 याप्रमाणे अनुदान वाटप होते. तीन वर्षांत प्रतिहेक्टरी एकूण देय अनुदान आंबा पीकासाठी 71 हजार 997 रू., पेरू कलमांसाठी 77 हजार 692 रू., संत्रा-मोसंबीसाठी 89 हजार 275 रू., कागदी लिंबू रोपे 72 हजार 655 रू., सीताफळ कलमे 91 हजार 251 रू., आवळा 63 हजार 640 रू. व डाळिंबासाठी 1 लक्ष 26 हजार 321 रू. अनुदान आहे.

जिल्ह्यातील ओलिताची सोय असणा-या शेतक-यांना योजनेचा लाभ मिळतो. कृषी विभागाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक आहे. वैयक्तिक शेतक-यांना लाभ घेता येईल.

संकेतस्थळावर पूर्वसंमतीसाठी घटकांतर्गत लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिका-यांशी संपर्क करावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :