तळागाळापर्यंत पोहोचून 'सर्वांसाठी न्याय' हे ब्रीद सार्थ ठरवा - न्यायमूर्ती अनिल किलोर

 











विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने चान्नी येथे शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा

अकोलादि १९ भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना दिलेले दिलेले समान हक्क व अधिकार केवळ संविधानापुरते मर्यादित न राहता शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचले पाहिजेतन्यायापासून कुणीही वंचित राहू नये तेव्हा 'सर्वांसाठी न्यायहे ब्रीद सार्थ ठरेलअसे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पातुर तालुक्यातील चान्नी येथे आयोजीत शासकीय सेवा व योजना महामेळाव्यात बोलत होते.

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एसतिवारीजिल्हाधिकारी अजित कुंभारजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकरअपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरेबार कॉन्सीलचे सदस्य ॲड.मोतीसिंग मोहताजिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडहेमंत मोहतान्यायाधीश कैलास कुरंदळेतालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.रवीकुमार खांबलकर आदी उपस्थित होते.

महामेळाव्यामध्ये विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आलेन्यायमूर्ती श्री.किलोर म्हणालेगावातील भांडणतंटे गावातच सोडवले जावेत जेणेकरून नागरिकांना न्यायालयापर्यंत येण्याची गरजच पडणार नाहीत्या दृष्टीने न्यायदूतांनी कार्य करावेजिल्हाधिकारी श्री.कुंभार म्हणालेजिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात ईप्रणाली प्रभावीपणे राबविण्याबाबत कार्य केले जात असून नागरिकांना विविध कागदपत्रांसंदर्भात त्यांच्या फाईलची सद्य:स्थिती एका क्लिकवर तपासता यावी या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायाधीश विलास खांडबहाले व न्यायाधीश विभा दुर्षे यांनी केले तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी व्यक्त केलेयावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विधीज्ञअधिकार मित्र आदी उपस्थित होतेविविध सेवा व योजनांचे प्रमाणपत्र वितरण
बेबी केअर किटचे वितरण पूजा लखन इंगळे निकिता नारायण येनकर कोमल अर्जुन टाले कोमल धनंजय येनकर यांना करण्यात आलेसंजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत शालिग्राम नामदेव राऊत यांना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना प्रतिभा आत्माराम तायडे यांना निराधार योजना कमल किसन ताले यांना श्रावणबाळ योजना लाभ वितरित करण्यात आला तर स्नेहल बाबुराव इंगळे यश गोपाल ताले संकेत राजाभाऊ मुळे यांना जात प्रमाणपत्राचे वितरण निरंजन आढाव संजय बोचरे यांना उत्पन्न प्रमाणपत्र तर मनोज संतोष वानखडे यांना अधिवास प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा