विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम चान्नी येथे रविवारी शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा

 

विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

चान्नी येथे रविवारी शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा

अकोला, दि. 14 : राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या  निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वकील संघ व विविध शासकीय कार्यालयांच्या सहकार्याने पातूर तालुक्यातील चान्नी या गावी 'शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा' रविवार, दि. १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. चान्नी व परिसरातील गावांतील नागरिकांच्या शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणे, अडचणी यांचे निराकरण या माध्यमातून केले जाईल.

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अनिल एस. किलोर यांच्या हस्ते, तसेच अकोला जिल्हयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस. तिवारी यांचे अध्यक्षतेत शुभारंभ समारंभ होणार आहे. विविध अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

चान्नी व परिसरातील गावातील नागरिकांनी शासन स्तरावर काहीही अडचणी असल्यास त्याबाबतची माहिती त्या त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, चान्नी पोलीस ठाणे यांच्याकडे त्वरित कळवावे जेणेकरून मेळाव्यात  अडचणींचे निराकरण करता येईल. सदर महामेळाव्याचा चान्नी व परिसरातील गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. योगेश सु. पैठणकर, तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष न्या. कैलास कुरंदळे, तालुका वकील संघाचे अॅड. रविकुमार खांबलकर   यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :